संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ आज सकाळी आराम बसने एसटीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ एसटी डेपो बाहेर पडत असतानाचा मुंबईहून कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या आराम बसने एसटीला जोरदार धडक दिली. आज पहाटे सकाळी ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात एसटी बसमधील १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कोणाचाही मृत्यू झालेला नसून जखमी प्रवाशांवर संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.