गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर फिरणाऱ्या दहावी निकालाच्या तारखांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अखेर पूर्णविराम दिला. मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवार (८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर या नऊ विभागीय मंडळांतर्फे एक मार्च ते २२ मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला यंदा राज्यभरातून १७ लाखांपेक्षा आधिक विद्यार्थी बसले होते. गेल्यावेळी प्रमाणे यावेळी हा दहावीचा निकाल ८ जूनला १ वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी : बीएसएनएल मोबाइलधारकांना ५७७६६ या क्रमांकावर टऌररउ असा लघुसंदेश पाठवून निकाल पाहता येईल.
निकालासाठीची संकेतस्थळे
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.
असा पाहा निकाल
- वरीलपैकी एका संकेत स्थळावर जा
- संकेत स्थळावर स्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
- आसनक्रमांक टाका
- निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल
- निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल
वरील संकेस्थळांवर विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. तसंच मेसेजच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळेल. त्यासाठी आसनक्रमांक नोंदवून ५७७६६ या क्रमांकावर मेसेज पाठवावा.
[…] हेही वाचा ( SSC Result 2019 : असा पाहा दहावीचा निकाल ) […]