हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४६वा शिवराज्याभिषेक दिन असल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. आज रायगडावर अनेक शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती. मात्र, आज रायगडावरच शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा साजरा केला नाही तर मुंबईची लाईफलाईन रेल्वेमध्येही शिवभक्तांनी पोवाडा गाऊन राज्यभिषेक सोहळा साजरा केला आहे. लोकलमध्ये पोवाडा गात एका तरुणाने याची प्रचिती दिली आहे. लोकलमध्ये पोवाडा गातानाचा तरुणाचा हा व्हिडीओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असून त्या तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अविनाश आंब्रे असे त्या तरूणाचे नाव आहे. तो डोंबिवलीचा राहिवासी आहे. आज सकाळी कल्याणहून सुटणाऱ्या ७.१८ च्या लोकलमध्ये प्रवास करत असताना अविनाश आंब्रे याने हा पोवाडा गायला. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोवाडा गायक तरूणालाही वाटल नसेल की आपण गायलेला हा पोवाडा येवढा व्हायरल होईल. मात्र, शिवाजी महाराजांवर गायलेल्या या पोवाड्याचे आणि त्या तरूणाचे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांकडून प्रशंसा केली जात आहे.