महाराष्ट्राची जीवनवाहिनी, आणि रस्त्यावर धावणारी लाल परी एसटीला (ST) ७१ वर्षपूर्ण झाले आहेत. एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने एसटीचा प्रवास कॅशलेश करण्यासाठी रिचार्ज कार्डची घोषणा केली आहे. तर आता या रिचार्ज कार्डमुळे पैशाशिवाय एसटीचा प्रवास करता येणार आहे. तसेच यासंबंधीत अजून एक आनंददायी बातमी म्हणजे प्रवाश्यांना आपल्या रिचार्ज कार्डच्या पहिल्या रिचार्जवर ५% कॅशबॅक मिळणार आहे. सध्या हे कार्ड प्रवाश्यांना एसटीच्या आगार घरात मिळण्याची सोय आहे. मात्र, लवकरच प्रवाशांना आपल्या मोबाईलवर रिचार्ज करता येणार आहे.
एसटी स्मार्टकार्ड विषयी
- एसटीच्या या स्मार्टकार्डची किंमत ५० रूपये आहे.
- सर्वप्रथम या कार्डची नोंदणा करावी लागणार आहे, त्यानंतर १०-१५ दिवसांनी हे कार्ड प्रवाशांना मिळणार आहेत.
- त्या स्मार्टकार्डला ३०० रूपयांच्या रिचार्ज केल्यावर ३१५ रूपये कार्डमध्ये जमा केले जाणार आहेत.
- याकार्डमध्ये जितकी रक्कम प्रवासी भरतील तेवढा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे.
- हा कार्ड काढण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. तसेच त्यासोबत मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्ट या तीनपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक असणार आहे.