Ads
बातमीदार स्पेशल

आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

shivaji maharaj
आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा
डेस्क desk team

आज ६ जून संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आणि गनिमी काव्याने मुघलांचे आक्रमण परतवून लावत स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्यातील पहिला राज्यभिषेक सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्याची तयारी काही महिन्या पूर्वीपासून सुरू होती. राज्याभिषेकासाठी निश्चित अशी कोणती परंपरा नव्हती. प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा-परंपरांचा अभ्यास केला. या दिवशी रायगडावर लाखाहून अधिक लोक समारंभाला जमा झाले होते. सर्व शिव प्रेमियांना त्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या राज्याभिषेक दिनाच्या ‘बातमीदार’ तर्फे शुभेच्छा!

राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला

  • शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्यासाठी काही महिन्या पूर्वीपासून रायगडावर देशातील कानाकोपर्‍यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे ११ हजार ब्राम्हण त्यांच्या कुटुंबासोबत रायगडवर उपस्थित होते.
  • प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात शिवाजी महाराज घडत होते. सर्वप्रथम त्यांनी आपल्या आई जिजाबाईंचा आशीर्वाद घेतला त्यानंतर महाराजांनी विविध देवदर्शन केले होते.
  • त्यानंतर अनेक विधी करून अखेर ६ जून १६७४ रोजी महाराज यांच्या राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरू झाला होता.
  • यावेळी शिवाजी महाराज्यांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे या राज्याभिषेकाच्या दोन प्रमुख विधी होते.
  • अष्टप्रधानांतील आठ प्रधान, गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्या जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक केला.
  • यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहीर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. बरोब्बर मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
  • राज्यभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. ३२ मण सोन्याचे (१४ लाख रुपये मूल्य असलेले) भव्य सिंहासन सजविले होते. त्या सिंहासनावर शिवाजी महाराड आरूढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळत, ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण करत छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला होता.
  • राजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना आणि इतर सर्व जनांना खूप धन भेट म्हणून दिले. त्यांनी एकूण सोळा प्रकारचे महादान केले. हे सर्व सकाळी आठ वाजण्या पर्यंत संपले.
  • त्यानंतर महाराज्यांची मिरवणूक काढत, विविध मंदिरांचे दर्शन घेउन. छत्रपती महाराज्यांनी महालात परतले होते.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

प्रतिक्रिया

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: