संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. तसेच रायगडाचा संपूर्ण परिसर शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषांनी निनादला. या सोहळ्याचा देशभरातून शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.
अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रायगडावर ३४६ वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याला बुधवार संध्याकाळपासूनच सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाले. त्यानंतर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम पार पडला. यात शिवकालीन युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांमध्ये तलवार, भाला, जांबिया, माडू, फरी- गदगा यांचे सादरीकरण झाले.यावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांच्यासह पोलंड, चीन येथील प्रतिनिधीही उपस्थित होते.
दरम्यान आज दिवसभर रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेय. तसेच शिवभक्तांनी रायगडावर आज स्वच्छता मोहिमही राबवली आहे.
[…] छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३४६वा शिवराज्याभिषेक दिन असल्याने आज संपूर्ण […]