पावसाला अवघे काही दिवस उरले असताना देखील प्राणी व जनमाणसाला दुष्काळ भेडसावतोय. अशीच काहीशी घटना अंबरनाथमध्ये समोर आलीय. अंबरनाथमध्ये तहानलेला वानर विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर या माकडाला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
सांबारी गावात आज दुपारी तहान भागविण्यासाठी एक वानर विहिरीत उतरला. मात्र, त्या वानराला विहिरीतून वरती चढता आलेच नाही. ग्रामस्थांना हि घटना कळताच त्यांनी वनविभागाला याबबत कळवले. वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ वानराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी त्यांनी वानराच्या शरीराला दोरी अडकवले व जाळीदार अशी दोऱ्या टाकून त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर या प्रयत्नाला यश आले आणि वानराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.