Ads
टेक- टॉक

Redmi K20 Pro ची रेकॉर्ड विक्री

Redmi K20 Pro
रेडमी के20 प्रो
डेस्क desk team

Xiaomi Redmiने स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ माजवलीय. पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोनच्या 2 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री झाली. त्यामुळे या फोनची अक्षरश रेकॉर्ड विक्री झालीय.चिनमध्ये लाँच करण्यात आलेल्या पहिल्याच सेलमध्ये ही विक्री झाली आहे. काही दिवसांपूर्वीच Redmi K20 Pro हा स्मार्टफोन चिनमध्ये लाँच झाला होता आणि लाँच नंतर पहिला सेल आयोजित करण्यात आला होता.यांनतर पहिल्याच सेलमध्ये या स्मार्टफोनच्या 2 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री झाली. केवळ दोन तासांच्या आत एवढा मोठा प्रतिसाद मिळाला.

इतकी असेल रक्कम

Redmi K20 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1999 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 20 हजार रुपये, 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिअंटची किंमत 2,099 चीनी युआन (जवळपास 21,200 रुपये), 8 जीबी रॅम और 256 जीबी स्टोरेज वेरिएंट को 2,599 चीनी युआन (जवळपास 26,200 रुपये) आहे.

फिचर्स

Redmi K20 मध्ये स्नॅपड्रॅगन 710 आणि Redmi K20 Pro मध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4000 एमएच बॅटरी स्मार्टफोनमध्ये आहे. 48 MP, 8 MP, 13 MP कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आलाय. तसेच या फोन अँड्रॉईड 9.0 असणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: