Ads
मनोरंजन

शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त पोस्टवर पायल रोहतगीची माफी

डेस्क desk team

वादग्रस्त वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत आली आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पायलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनही आक्षेपार्ह वक्तव्य करणारी पोस्ट शेअर केली होती. पण आता तिने आपल्या या वक्तव्यासाठी क्षमा मागितली आहे.

वादग्रस्त पोस्ट

माफीनामा

मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांना दुखावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे तिने म्हटले आहे. केवळ सत्य जाणून घेणे हा माझा उद्देश आहे. शिवाजी महाराज हे एक महान हिंदू सम्राट होते. मात्र, या सगळ्यामुळे हिंदू समाजाच्या मनात असणाऱ्या त्यांच्या अढळ स्थानाला कधीही धक्का लागणार नाही. पंरतु, या गोष्टींवरून सिद्ध होते की, धर्माच्या नावाखाली अनेक वर्षे आपली दिशाभूल करण्यात आली, असेही पायलने म्हटले आहे. तसेच तिने मराठा आरक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वक्तव्यानंतर पायलवर टीकेची झोड उठली आहे. पायल रोहतगीने याआधी कमल हसन, राजा राम मोहन रॉय यांच्यावर ही तिने वक्तव्य केले होते.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: