हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन डायरेक्टर म्हणून लाभलेले आणि लोकप्रिय अभिनेता अजय देवगन याचे वडिल वीरू देवगण यांचे आज (27 मे) दीर्घ आजारांनी निधन झाले आहे. वीरू देवगण हे 85 वर्षाचे होते. वायोमानामुळे तब्बेत खालावली असल्याने सांताक्रुझ येथील सूर्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे.
पार्ट्या, कार्यक्रमांमध्ये रमत नसत
इन्कार, मि. नटवरलाल, क्रांती, शेहनशाह, हिंमतवाला, त्रिदेव, बाप नंबरी बेटा दस नंबरी, फुल और काँटे अशा अनेक चित्रपटातील अॅक्शन दृश्यं त्यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली होती. वीरू देवगण बॉलिवूडच्या पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये रमत नसत, शेवटची हजेरी त्यांनी फेब्रुवारी महिन्यात टोटल धमाल चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला लावली होती. वीरू देवगण यांच्या पार्थिवावर विलेपार्ले (प) येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.