आज २५ मे आणि हा दिवस इंटरनॅशनल मिसिंग चाईल्ड डे म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून रेल्वे सुरक्षा बलाने आणि लायन्स क्लबने एक कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच त्यांच्या सोबत मिसिंग मुलांना सोधून त्यांचा सांभाळ करतात अशा एमजीओनी सुद्धा सहभाग घेतला आहे. तर हा कार्यक्रम मिसिंग मुलांच्या बाबतीत नागरिकांमध्ये जानजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. तसेच नागरिकांना जर मिसिंग मुल आपल्या जवळपास आढळल्यास त्यांचा सांभाळ करू शकतात अशा एनजीओकडे सोपवा किंवा पोलीस अधिकारांकडे सोपावा अशी विनंती करण्यात आली. हा उपक्रम मुल हरवणे, मुलांचे अपहरण , वाम मार्गावर जाणाऱ्या मुल, मुलांची विक्री अशा गोष्टीवर आळा बसवण्यासाठी उपक्रमाचे आयोजन केले होते.

नागरिकांना जागृत करताना लायन्स कलब आणि रेल्वे सुरक्षा बल
मुलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी
हा कार्यक्रम चर्चेगेट, मुंबई सेंट्रल, दादर, अंधेरी आणि बोरिवली या महत्वाच्या स्थानकांवर आयोजित करण्यात आला होता. तसेच रेल्वेमध्ये मुलांचे अधिकारांचे सांभाळ आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई सेंट्रल विभागातील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिन्स आणि सुरत रेल्वे स्थानक यांना अंमलबजावणी करण्यासाठी जवाबदारी देण्यात आली आहे.