कान्स फिल्म फेस्टिव्हल हा बॉलिवूड विश्वातला अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा सोहळा आहे. यावर्षीचा हा 72 वा सोहळा होता. या फेस्टिव्हलमध्ये दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, डायना पेंटी, सोनम कपूर, प्रियंका चोप्रा या सौदर्यवतीने यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये आपल्या निराळ्या अंदाजात रेड कार्पेटवर हजेरी लावली. मात्र, या अभिनेत्र्यामधील दिपीका आणि ऐश्वर्या यांनी आपल्या हटके लूकने कान्स फेस्टिव्हल गाजला. त्याच्या या फेस्टीवल अंदाजचा अमुल कंपनीने कौतुक केले आहे.
अमुलचे खास पोस्टर
अमुल कंपनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक पोस्टर शेअर केला आहे. त्या पोस्टरमध्ये कान्स फेस्टिव्हल मध्ये दिपीका पादुकोण हिने घातलेला हिरव्या आणि ऐश्वर्या राय बच्चननी घातलेला मेटॅलिक गोल्डन गाऊनमध्ये अमुल गर्लला दाखवली आहे. तसेच त्यावर ‘गोरी तेरा ‘गाऊन’ बडा प्यारा’ असे लिहून त्या दोघींचे कौतूक केले आहे.
#Amul Topical: Deepika and Aishwarya makes fashion waves at Cannes! pic.twitter.com/BKCaFfxA4w
— Amul.coop (@Amul_Coop) May 21, 2019
ऐश्वर्या राय बच्चन
दिपीका पादुकोण
https://ww.instagram.com/p/BxkijtmABWP/?utm_source=ig_web_copy_link