मुंबई – शाओमी या चिनी कंपनीने अलिकडेच Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोन लाँच केला होता. याच स्मार्टफोनचा आज २२ मे ला भारतात फ्लॅश सेल होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून हा सेल सुरू झाला आहे. Flipkart, कंपनीच्या अधिकृच वेबसाइट Mi.com आणि Mi Home Stores या ई- कॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
किंमत आणि ऑफर
Redmi Note 7 Pro या स्मार्टफोनच्या ४ जीबी+64 जीबी स्टोरेजची किंमत 13,999 रूपये, तर 6 जीबी+128 जीबी स्टोरेजची किंमत 16,999 रूपये आहे. तसेच हे स्मार्टफोन नेप्ट्यून ब्लू, नेबुला रेड आणि स्पेस ब्लॅक या रंगाममध्ये उपलब्ध आहेत. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना खास ऑफरसुद्धा देण्यात आल्या आहेत. ऑफरनुसार या स्मार्टफोन जिओ युजर्सला डबल डेटा ऑफर दिला जाणार आहे
फीचर्स
- 6.3 इंचाचा फुल HD+ डॉट नॉच डिस्प्ले
- पिक्सल रेजोल्यूशन 2340×1080
- प्रायमरी 48 मेगापिक्सल, सेकेंडरी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा
- सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा कॅमेरा
- 4000 एमएएच ची बॅटरी