भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून बुधवारी (२२ मे रोजी) पहाटे ५ वाजल्याच्या सुमारास पीएसएलव्हीसी ४६ सोबत RISAT-2B या अत्यंत महत्वाचा उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पृथ्वीची निगराणी ठेवण्यासाठी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आहे. या उपग्रहाद्वारे भारताच्या सीमेवरिल घुसखोरी रोखता येणे शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त शेती, वन आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
🇮🇳 #ISROMissions 🇮🇳#PSLVC46 successfully injects #RISAT2B into Low Earth Orbit.
Here's the view of #RISAT2B separation captured by our onboard cameraOur updates will continue. pic.twitter.com/WUTBdNH2XJ
— ISRO (@isro) May 22, 2019
या रडारचेही प्रक्षेपण
तसेच RISAT-2B हा उपग्रह फक्त पृथ्वीवर निगराणीच ठेवणार नाही आहे. तर आपल्याला हवेचा अंदाजसुद्धा घेता येणार असून नैसर्गिक संकटांचा तोंड देता येणार आहे. तसेच RISAT-2B या उपग्रहसोबत सिथेंटिक अपर्चर रडारचेही प्रक्षेपण करण्यात आला आहे. याचा दूरसंचार क्षेत्राला प्रचंड फायदा होणार आहे.
#ISROMissions#PSLVC46 lifts-off from Sriharikota.
Here's a shot of the first stage separation.
Stay tuned !!! pic.twitter.com/qJ20Zfprmr
— ISRO (@isro) May 22, 2019
उपग्रहाची वैशिष्ट्य
हा उपग्रह ६१५ किलोग्रॅम वजनाचा आहे.
या उपग्रहाद्वारे जमिनीवरील ३ फुटापर्यंतचे फोटो घेता येणार आहे.
मुंबईवर झालेला २६/११ च्या हल्ल्यानंतर या सिरिजचे उपग्रह विकसित करण्यात आले.
Indian Space Research Organisation (ISRO) launches PSLVC46 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. PSLVC46 will launch the RISAT-2B radar earth observation satellite into a 555 km-altitude orbit. pic.twitter.com/iY2paDVjls
— ANI (@ANI) May 22, 2019
उपग्रह सोडण्यापूर्वी घेतले दर्शन
या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यापूर्वी इस्त्रोचे चेअरमन के.सीवन यांनी तिरूपती मंदीराला जाऊन पुजा केली. कोणतेही उपग्रह सोडण्या आधी इस्त्रो ही संशोधन संस्था तिरूपतीला जाऊन पुजा विधी करते.

रीसॅट-२बीची यशस्वी मोहिम