Ads
बातम्या

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली

डेस्क desk team

मुंबई – मुंबईची मध्य रेल्वे नेहमीच काहीना काही बिघाडासाठी ओळखली जाते. त्या तुलनेत पश्चिम रेल्वे कधीतरी रखडते. जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. १५ ते २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर ही वाहतूक सुरू झाली. मात्र लोकलअत्यंत धीम्या गतीनं धावत होत्या. सकाळी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

आज सकाळी ७.५० च्या दरम्यान जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे विरारवरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल ठप्प झाल्या. बोरिवलीच्या पुढे एकही लोकल जात नव्हती. भाईंदर स्टेशनच्या पुढे चार ते पाच लोकल थांबल्या होत्या. ऐन गर्दीच्या वेळी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लोकल ठप्प झाल्याने पश्चिम रेल्वेवरील अनेक रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, १५ ते २० मिनिटाने रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली. मात्र लोकल अत्यंत धीम्या गतीने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: