आपल्याला सदैव साथ देणारी सावली ही येत्या २३ मे ला नाहिसी होणार आहे. ही खगोलीय घटना सूर्य आपल्या डोक्यावर आकाशात आल्याने असे घडते. . पृथ्वी तिच्या भ्रमण कक्षेशी कलून फिरत असल्यामुळे दररोजचा सूर्योदय हा नेमका एका ठिकाणी न होता, त्याचे स्थान बदलत असते. २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या विषुवदिनी सूर्याबरोबर पृथ्वीच्या विषुववृत्तावर उगवल्याने दिवस-रात्र समान असतात. त्यावेळी कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत आपण शून्य सावलीची अनुभूती घेता येणार आहे.
स्थानिक सावलीची येणार अनुभूती
सूर्य जेव्हा पृथ्वीवरील स्थानांचे सरळ पूर्व रेषेत येऊन दुपारी जेव्हा डोक्यावर येईल, तेव्हा आपली सावली आपल्या पायाजवळ आलेली असेल. सकाळी लांब पर्यंत पोहचणारी सावली सूर्य आकाशात वर आल्याने आपली सावली पाय जवळ येणार आहे. सर्वात लहान सावली ही वेळ त्या ठिकाणची माध्यान्ह वेळ असेल. तसेच त्या सावलीला स्थानिक सावली ही असे म्हटले जाते.