मुंबई – आपल्या उत्कृष्ट अभिनयाने स्वतःची वेगळी निर्माण करणारी रिंकू राजगुरू प्रेक्षकांसमोर पुन्हा नव्या रूपात येत आहे. यावेळी ती पूर्णपणे बोल्ड अवतारात दिसणार आहे. तिच्या आगामी सिनेमा मेकअपचा टीझर नुकताच रीलिज करण्यात आला आहे.
काय आहे टीझरमध्ये
या सिनेमाच्या टीझरमध्ये रिंकूच्या दारु पिताना दिसत आहे. सामान्य मुलगी, मेकअप यावरून समाजाची तिच्यावर होणारी तानेशाही यावर टीझरमध्ये भाष्य करण्यात आले आहे.गणेश पंडित यांनी सिनेमाचे दिग्दर्शित केले असून रिंकूचा हा अंदाज पाहून चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे.