Ads
बातम्या

‘रंपाट’ प्रेक्षकांच्या आशेवर पाणी

rampaat marathi movie
रंपाक मराठी चित्रपट समीक्षण
डेस्क desk team

वृषाली कोतवाल – रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज दिग्दर्शक आहेत. नटरंग, बालगंधर्व, टाईमपास, न्यूड असे सिनेमा देणारा रवी जाधव हा लेखक दिग्दर्शक आपल्या कथेमध्ये दम असल्याने आणि सफाईदार अव्वल दर्जाचा चित्रपट मांडण्यासाठी ओळखला जातो. या शुक्रवारी १७ मे ला प्रदर्शित झालेला ‘रंपाट’ चित्रपट त्याला अपवाद ठरला आहे. यावेळी रवी जाधवच्या कथेमध्ये तितकासा दम नसल्याने हा चित्रपट त्याच्या यशच्या यादीत बसणारा ठरला नाही आहे. ‘रंपाट’ चित्रपटामध्ये निव्वळ मनोरंजन, रोमान्स, संगीत हे ठासून भरलेला मसाला असला तरी कथेतच दम नसेल तर ‘कैसे चूमेगी दुनिया’ हा प्रश्न नक्कीच उदभवतो. या चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी दिसले आहेत.

‘रंपाट’ चित्रपटाची कथा

‘रंपाट’ चित्रपटाची कथा महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर येथील मिथून (अभिनय बेर्डे) आणि विजया ऊर्फ मुन्नी (काश्मिरा परदेशी) यांच्या भोवती फिरणारी आहे. हे दोघेही सिनेमाच्या चंदेरी दुनियेत आपल्याला जाता यावे यासाठी जीवापाड प्रयत्न करत असतात. स्वप्ननगरी मुंबईत जाण्याची संधीची वाट ते पाहत असतात. मिथूनची आई म्हणजेच काळूबाई (प्रिया बेर्डे) मिथून पोटतात असतानाच तिचा नवरा गळफास लावून आत्महत्या करतो. त्यावेळी काळूबाई सिनेमा बघून जगायला शिकते आणि आपल्या मुलाला अभिनेता बनवण्याच ठरवते. तसेच दुसरीकडे कोल्हापूरची मून्नीचे वडिल तिला पेलवान बनवायचे स्वप्न बघत असतात. मात्र, मून्नीला अभिनेत्री बनायचे असते. त्यामुळे सोलापूरचा मिथून आणि कोल्हापूरची मुन्नी या सिनेविश्वात येण्यासाठी मुंबईत धाव घेतात. आपल्या पालकांना सुख, शांती, समाधान मिळवून देण्यासाठी झटपट यश मिळवण्यासाठी ते दोघेही झटतात. त्यात त्यांना सिनेविश्वात काम मिळवण्यासाठी येणाऱ्या असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, यासगळ्या अडचणींनंतर त्यांना साथ मिळेते ती फटाफटची (कुशल बद्रिके). फटाफटची साथ, मिथुन आणि मुन्नीचे स्ट्रगल, त्यांच्यासमोर येणाऱ्या असंख्य अडचणी ह्यांच्यातून वाट काढत काढत यशाच्या मार्गावर कसे पोहचतात? आपल्या पालकांच्या आशा पूर्ण करू शकतात का? ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हांला सिनेमा पाहिल्यावरच मिळेल.

चित्रपट का पाहावा?

‘रंपाट’ चित्रपट मनोरंजन, सोमान्स, संगीतने ठसठसून भरलेला आहे. या मराठी चित्रपटाचे आर्कषण ठरलेल “रंपाट लाय रंपाट बिनधास्त हि मराठी पोर ही रंपाट” हे आहे. तसेच ‘रंपाट’मध्ये प्रथमच मायलेकाचे म्हणजेच प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे या जोडीचा अभिनय पाहायला मिळेल. तसेच ‘रंपाट’ चित्रपटातील संवाद प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे आहे. चित्रपटाची कथा दमदार नसली तरी One Time Movie बघू शकतो असा ‘रंपाट’ चित्रपट आहे.

रेटींग : ⭐⭐⭐ ( 3/5 )

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: