जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वत:चे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही गौतम बुध्दांनी अनुभवला. मात्र, वैशाख शुध्द पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ आणि ते दुःख नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.
बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 18 मे रोजी साजरी केली जाते. यानिमित्त ‘बातमीदार’तर्फे बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!
प्रारंभ
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली.
- दिल्लीनंतर १९५३ पासून बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.
- बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष आहे, ती कारणे म्हणजे… याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.
- बुद्ध पौर्णिमा ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जातो. यात श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, नेपाळ, थायलंड, मलेशिया, म्यानमार, इंडोनेशिया आणि पाकिस्तान या देशांचाही समावेश आहे. श्रीलंकेत बुद्ध पौर्णिमेला ‘वेसाक’ असं म्हणतात.
- भारतात आणि महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते मानले जातात.