वसई – मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून असंख्य नागरीका प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान प्रवाशी अपघाताच्या व अस्वच्छतेच्या घटना समोर येतात.या घटनांनवर अंकुश घालण्यासाठी आज लायन्स क्लब विरार व रेल्वे आरपीएफतर्फे रेल्वे प्रवासी सुरक्षा व स्वछता जनजागृती अभियान राबवण्यात आले.
या अभियानात लायन्स प्रमुख प्रशांत पाटील यांच्यासह इतर सदस्य व आरपीएफच्या जवानांनी मिळून प्रवाशांमध्ये रेल्वे रूळ ओलांडू नये, धावती ट्रेन पकडू नये धरणे, कचरा ट्रेनमध्ये फेकु नये अशा प्रकारचा जनजागृतीपर आव्हान केले. तसेच लायन्सचे कार्यकर्ते व आरपीएफ संदेश फलक घेऊनही जनजागृती करत होते.लायन क्लब व आरपीएफच्या या अभियानाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.