भारताच्या जी. एस. लक्ष्मीने इतिहासात नोंदवाव असे कार्य केलेय. लक्ष्मीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आलीय. या निवडीमुळे लक्ष्मी यांनी भारताच्या पहिल्या महिला आयसीसी मॅचरेफरी होण्याचा मान पटकावलाय.
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या क्लेअर पोलोसक यांनी पुरुषांच्या सामन्यात अंपायरिंग करत नवा मापदंड प्रस्थापित केला होता.त्यांनतर आता लक्ष्मी महिला क्रिकेट सामन्यासह पुरुषांच्या सामन्यातही मॅचरेफरी म्हणून दिसतील. भारतासाठी ही खूप मोठी बाब आहे. 1986 ते 2004 या कालावधीत त्या क्रिकेट खेळल्या होत्या. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मी आऊटस्विंग करणाऱ्या गोलंदाज म्हणूनही प्रसिद्ध होत्या. या कालावधीत त्यांनी भारतीय संघासह साऊथ सेंट्रल रेल्वे, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व विभाग, दक्षिण विभाग अशा संघांचं प्रतिनिधित्व केले होते.त्यांनतर 2008 पासून महिला क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी 3 महिला वनडे तसंच 3 महिला ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम केलेय.
खेळाडू म्हणून प्रदीर्घ कारकीर्दीनंतर मॅचरेफरी म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्याकडे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना या अनुभवासह जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न असेल,” असे लक्ष्मी यांनी सांगितले