मुंबई – बहुचर्चीत असा One Plus 7 pro आणि One Plus 7 हे स्मार्टफोन आज लाँच होणार आहेत. लंडन, न्यूयॉक आणि भारतामध्ये अशा तीन ठिकाणी एकाच वेळी हे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. One Plus 7 pro हा स्मार्टफोन प्रीमियम फीचर्ससह लाँच होणार आहे. One Plus 7 pro या स्मार्टफोनची किंमत ४९,९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. तर One Plus 7 ची किंमत ३८,९९९ रूपये असू शकणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स अॅमेझॉनवर या ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध असणार आहे. अॅमेझॉनशिवाय हे स्मार्टफोन्स क्रोमा आणि रिलायन्स डिजीटल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असणार होणार आहे.
One Plus 7 चे फीचर्स
- ६.४ इंचचा फुल एचडी डिस्प्ले
- ४८+५ मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा
- ३,७०० एमएएच ची बॅटरी
- ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज. ८ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध
One plus 7 pro चे फीचर्स
- ४८+८+१६ मेगापिक्सल कॅमेरा सेंसर
- सेल्फीसाठी १६ मेगापिक्सल पॉप अप कॅमेरा
- एचडीआर १० डिस्प्ले, ६.७ इंचा कर्व्ड डिस्प्ले
- नेबूला ब्लू, मिरर ग्रे रंगाच्या पर्यायात उपलब्ध
- ६ जीबी, ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध
- अशा प्रकारच्या फीचर्समध्ये उपलब्ध असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर यासंबधीत माहीत स्मार्टफोन लाँच झाल्यावर समोर येणार आहे.
[…] स्मार्टफोन कंपनी One plus ने गेल्या महिन्यातच One plus 7 आणि One plus 7 Pro […]