नवी दिल्ली – देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एअर इंडियाने भन्नाट ऑफर आणलीय. यामुळे असंख्य प्रवाशाचे हवाई प्रवासाचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. या तिकिटांचे बुकिंग कंपनीच्या काउंटरवर, मोबाइल अॅप, वेबसाइटवर आणि ट्रॅव्हल एजंटांच्या माध्यमातून करता येणार.
एअर इंडियाने प्रवाशांसाठी विशेष योजना आणलीय. या योजेनेअंतर्गत कोणत्याही उड्डाणापूर्वी तीन तास आधी तिकीट बुक केल्यास प्रवासशुल्कात मोठी सवलत देण्यात येणार.त्यामुळे अचानक अखेरच्या क्षणी तिकीट खरेदी करणाऱ्यांना मोठा फायदा होणार.
Air India: The national carrier has decided for the domestic sector that “very last moment inventory” i.e available seats within 3 hours of departure would be sold at a hefty discount, normally exceeding 40% of the selling price. pic.twitter.com/68YnXfJc7L
— ANI (@ANI) May 10, 2019
कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, उड्डाणापूर्वी जर विमानामध्ये आसने शिल्लक राहात असतील, तर ती तीन तास आधी सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. याआधी शेवटच्या क्षणातील तिकिटांसाठी सर्वसामान्य तिकीटदराच्या तुलनेत ४० टक्के अधिक रक्कम मोजावी लागत होती.