मुंबई – मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. नियुक्तीचा अधिकृत आदेश संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारतील.
देशात आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव निवडणूक आयोगाने स्विकारला. त्यामुळे आता आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती होणार.सद्यस्थितीत मुख्य सचिवपदी असणारे यु.पी.एस मदान यांनी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला. त्यामुळे अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.