Ads
बातमीदार स्पेशल

‘या’ दिवशी उन्हात आपली सावलीच दिसणार नाही !

डेस्क desk team

मुंबई – येत्या २६ मे ला भरदिवसा उन्हात उभे राहिल्यास तुमची सावली तुम्हाला अजिबात दिसणार नाही.या दिवसाला गोलशास्त्राच्या भाषेत ‘ शून्य सावली दिवस ’ (झिरो शॅडो डे) असे म्हणतात.

खगोलशास्त्र तज्ज्ञानुसार येत्या २६ मे रोजी भर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी तुम्हाला तुमचीच सावली दिसणार नाही. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली असे वाटते. त्यामुळे तुम्हाला शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. मकरवृत्त दक्षिणेकडच्या भागात आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्यावर येत नाही. पण दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर आल्याचा अनुभव येतो व शून्य सावलीचा अनुभव मिळतो.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: