मुंबई – ‘तारक मेहता का उलडा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील काही भागांमध्ये काम केलेल्या अभिनेता प्रतिश वोरा यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीचे निधन झाले आहे. खेळतांना तिच्या पास्टीकच्या खेळण्याचा काही भाग तिच्या गळ्यात अडकल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
राजकोटमध्ये अंतिम संस्कार
प्रतिश वोरा एका माध्यमाशी बोलतांना सांगितले की, ‘काल रात्री ती तिच्या खेळण्यासोबत खेळत होती. त्यावेळी खेळण्याता काही तुटलेला भाग तिने गिळला. हे सगळ कोणाच्या लक्षात येणाच्या आत घडले’. अभिनेता प्रतिश वोरा हे कमासाठी मुंबईत राहात असले तरी ते मुळचे राजकोटचे आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलीवर अंतिम संस्कार राजकोट येथे होणार आहे. त्यासाठी प्रतिश आणि त्यांची पत्नी तिचे पार्थिव आज विमानाने राजकोटला रवाना झाले आहेत.
साकारलेले अभिनय
प्रतिश वोरा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिके प्रमाणे त्यांनी क्राईम पेट्रोल या कार्यक्रमामधील काही भागांमध्ये अभिनय केले आहे. तर सध्या ते स्टार भारत या वाहिनीवरिल प्यार का पापड या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारली आहे.