Ads
बातम्या

हार्बर मार्गावर आज रात्रकालीन पाच तासांचा ब्लॉक

डेस्क desk team

मुंबई – पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे आज बुधवार, ८ मे रोजी मध्यरात्री ११ वाजून ३० मिनिटांपासून ते ९ मे रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत हार्बरच्या दोन्ही मार्गांवर मेजर ब्लॉक घेण्यात आलाय.यामुळे या मार्गावरील लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

वांद्रे स्थानकातील गर्डर हटविण्याच्या कामासाठी हा या ब्लॉक घेण्यात आलाय. यामुळे ब्लॉक काळात पश्चिम रेल्वे मार्गावरील दोन्ही दिशेकडील जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते माहिम स्थानकादरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील सीएसएमटीहून अंधेरीकडे रात्री १० वाजून ३७ मिनिटांनंतर आणि ११ वाजून ४ मिनिटांनंतर हार्बर मार्गाहून सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व लोकल रद्द.सीएसएमटीहून वांद्रे दिशेकडे जाणारी रात्री १० वाजून ५४ मिनिटांची, रात्री १२ वाजून ३६ मिनिटांची लोकल आणि सीएसएमटीहून अंधेरी दिशेकडे जाणारी रात्री ११ वाजून २ मिनिटांची, रात्री ११ वाजून ३८ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली.

अंधेरीहून सीएसएमटीकडे येणारी रात्री ११ वाजून ३९ मिनिटांची, रात्री १२ वाजून २८ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे. वांद्रेहून सीएसएमटीकडे येणारी रात्री ११ वाजून ३२ मिनिटांची लोकल रद्द करण्यात आली आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: