वृषाली कोतवाल – राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला होता. शाहू महाराजांनाकोल्हापूरचे शाहू आणि चौथा शाहू म्हणूनही संबोधले जायचे. शाहू यांच्या महत्वपूर्ण कार्यामुळे ते ‘राजर्षी ‘पदापर्यंत पोहचले होते. तसेच शाहू हे कोल्हापूर राज्याचे इ.स १८८४ ते १९२२ सालामध्ये छत्रपती होते. राजर्षी शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक करण्यात आला होता. शाहू महाराज तब्बल २८ वर्ष म्हणजेच सन १९२२ पर्यंत छत्रपती होते. तसेच राजर्षी शाहू महाराज यांचा मृत्यू ६ मे १९२२ साली मुबंई येथे झाला.
शाहू महाराज यांच्या घराण्याबद्दल
शाहू महाराजांचा जन्म हा कागल येथील घाटगे घराण्यात झाला होता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशंवत होते. तसेच त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आणि आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूरचे शाहू यांना चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी दत्तक घेतले होते. त्यानंतर यशवंत यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले होते.
राजर्षी शाहू यांचे महत्वपूर्ण कार्य
- राजर्षी शाहू महाराज यांनी समाजामध्ये नवे बदल घडून आणण्यासाठी अनेक कार्य केली आहेत. इ.स १९१९ साली शाहू यांनी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद केली.
- जातिवाद नष्ट होण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा अस्तित्वात आणला होता. तसेच त्यांनी इ.स १९१७ साली विधवा महिलांसाठी पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली होती.
- चौथे शाहू यांनी रयतेच्या उन्नतीसाठी कृषी, उद्योग, सामजिक तसेच विविध क्षेत्रात भरीव कार्य केले होते. शेतीसाठी पाणी पुरवठा योग्य होण्यासाठी त्यांनी तलाव, विहीरी, कालवे बांधायला प्रोत्साहन दिले. शेती कामात विकास होण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.
- शाहू यांनी कापड उद्योगाकडे ही भर दिला होता. त्यांचे मुख्य उदाहरण म्हणजे कोल्हापूरमधील शाहू मिल होय. या मिल नंतर अनेक ठिकाणी कापड निर्मितीच्या उद्योगाला चालना मिळाली होती.
- शाहू महाराज हे अस्पृश्य, तसेच जातपात मानणाऱ्यांच्या विरोधात लढा देऊन रयतेचे देव बनले होते.