ज्यात काल चौथ्या टप्प्यातले मतदान संपुष्ठात आले. एकीकडे काही ठिकाणी ईव्हीएम बिघाडामुळे सहा वाजल्या नंतरही मतदान होत असल्याचे चित्र असतानाचा दुसऱ्या मतदार संघात मात्र मतदान संपून सुद्धा मतदाना पेक्षा लांबच लांब रांगा लागल्याचा चित्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसतेय.
व्हिडीओत दिसणाऱ्या रांगा ह्या कुठल्याही मतदान केंद्रावरच्या रांगा नसून, मद्यपिंच्या हक्काच्या रांगा आहेत. तीन दिवस कोरड पडलेल्या जिभेला दारूची चटक लागण्यासाठी बिअर शॉपपुढे लागलेल्या या रांगा आहेत. मतदान पार पडेपर्यंत दारूबंदी होती. त्यामुळे तळीरामांचे तीन दिवस कोरडे गेले होते. त्यामुळे मतदान सायंकाळी संपल्यावर मद्याची दुकाने उघडल्यानंतर दारूसाठी दुकाना बाहेर मतदाना पेक्षा लांबच लांब रांगा लागल्याचा मुंबईतील चित्र होते.