यवतमाळ – यवतमाळ जिल्हयात मारेगावजवळ ट्रक आणि मॅक्स गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या घटनेत नव्याने संसाराला सुरुवात करणाऱ्या नववधूसह 3 जण ठार तर 5 गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान जखमींना उपचाराकरिता चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहेत.
हिंगोली जिल्हयातील बाळापूर येथील हे कुटुंब चंद्रपूरातील लग्न उरकून महांकाली देवीच दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असताना अज्ञात ट्रकने टाटा मॅक्स (MH 34 K 2438) गाडीला जोरदार धडक दिली. मारेगाव येथील तुळशीराम रेस्टारंट जवळ मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
या अपघातात लक्ष्मीबाई भारत उपरे (60), सानिका किसन गोपाळे (20) यांचा जागीच मृत्यू झाला असून साक्षी देविदास उपरे (नववधु 18) हीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर राजनंदिनी सुनिल पवार (4), साधना कोंडबा गोंधरे (35), पूजा शंकर उपरे (20), चंपाबाई बाबा पेंडलेवार (70) जखमी झाले असून त्याचा चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.