बातमीदार टीम : भारतात चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवणारे, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इ. सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. दादासाहेब पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात व चित्रपट दाखवीत. दादासाहेब फाळके यांची आज 150 वे स्मृतिदिन असून त्यानिमित्त “बातमीदार” चे त्यांना अभिवादन.
काही रंजक गोष्टी
◾ नाशिकच्या त्र्यंबक 30 एप्रिल 1870 रोजी त्यांचा जन्म झाला.
◾ खरे नाव धुंडिराज होते परंतु नंतर दादासाहेब फाळके या नावाने प्रसिध्द झाले.
◾मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले.
◾ 1885 साली ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेत, वर्षभरातच फर्स्ट ग्रेड परीक्षेत उत्तीर्ण.
◾ कलेचे प्रचंड वेड असलेल्या फाळकेंनी चित्रकला, वास्तुकला, प्रोसेस फोटोग्राफी अशा अनेक कला आत्मसात केल्या.
◾ मुंबईत 15 एप्रिल 1910 रोजी ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ‘द लाईफ ऑफ ख्राइस्ट’ हा अर्ध्या तासाचा मूकपट पाहून प्रेरणा घेत भारतात ही चित्रपट बनवण्याचा निश्चय केला.
◾ चित्रपट विषयक तांत्रिक ज्ञान मिळवण्यासाठी ते लंडन गेले. तिथुन त्यांनी कॅमेरा, कच्ची फिल्म सारखं साहित्य खरेदी केलं आणि 1 एप्रिल 1912 मध्ये “फाळके फिल्म्स” ची स्थापना केली.
◾ 3 मे 1913 रोजी ‘राजा हरिश्चंद्र’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट तयार केला आणि भारतात चलचित्रांचा आरंभ झाला. या मुकपटाचं लेखन, संवाद, दिग्दर्शन हे दादासाहेब फाळकेंचच होतं.
◾ फाळकेंनी “मोहिनी भस्मासूर”, “सत्यवान सावित्री”, “लंकादहन” सारख्या आशयपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली.
◾ चित्रपटाचे आद्य जनक दादासाहेब फाळके यांचं निधन 16 फेब्रुवारी 1944 रोजी नाशिक येथे झालं.
◾ दादासाहेब फाळकेंना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दीपासून चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत-तंत्रज्ञाला शासनाकडून ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येते.