राजापूर – कोकणातील राजापूर तालुक्यात पाच महिन्यानंतर पुन्हा गंगा अवतरलीय. त्यामुळे आता या गंगेचे दर्शन व स्नान घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमतेय.
राजापूरमध्ये 25 एप्रिलच्या दिवशी 8 वाजण्याच्या सुमारास गंगामाई अवतरल्याची माहिती मिळाली. राजापूर शहरापासून जवळच असलेल्या एका टेकडी परिसरात सुमारे 14 कुंड आहेत. एरवी खडखडाट असलेल्या या गंगेमध्ये पाणी आलं म्हणजे ‘गंगा आली’ असे समजले जाते. सध्या राजापूरामध्ये ही 14 ही कुंडं भरलेली आहेत.
यंदाच्या राजपूर गंगेची खास दृश्य
प्राचीन काळापासून राजापूरची गंगा ही दर तीन वर्षांनी प्रकट होते. मात्र मागील काही वर्षापासून गंगा प्रकट होण्याच्या चक्रामध्ये बदल झालाय. गेल्या वेळी 15 नोव्हेंबर 2018 दिवशी गंगा आली होती. त्यानंतर 100 दिवस वास्तव्यास असलेली गंगा गेली होती ती आज पुन्हा अवतरली.