वेब टीम – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच 20 रुपयांची नवी नोट चालणार आणणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या सहीने वैध नोटा अर्थव्यवस्थेत लागू करण्यात येणार असून यासोबतच 20 रुपयाच्या जुना नोटाही चलनात वापरात असणार आहेत.
20 रुपयांच्या नव्या चलनावर भारतातील संस्कृतीची ओळख पटवून देणाऱ्या एलोरा गुहाचे प्रतीक छापण्यात येणार आहे. या माध्यमातून भारताच्या ऐतिहासिक वास्तूंचा गौरव करण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात येतेय.
वैशिष्ठ्य
- हिरवळ पिवळ्या रंगाची ही नोट असणार.
- एलोरा गुहांच प्रतीकही नोटावर असेल.
- नवीन नोटेवर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांची सही असणार.
- तसेच महात्मा गांधींची प्रतिमा, अशोक स्तंभ, स्वच्छ भारत लोगो नोटांवर पाहायला मिळणार.
- जुन्या नोटाही चलनात असणार.