भूकंपाचा एक भयानक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत भूकंपामुळे बिल्डिंग चांगलीच हादरताना दिसतेय. हि घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे. फिलिपिन्सच्या पूर्व समर प्रांतातील शिकार देशाची राजधानी मनीला येथे 23 एप्रिल रोजी रिश्टर 6.5 च्या तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला. या भुकंपात एक कॉर्पोरेट ऑफिसची बिल्डिंग चांगलीच हादरली. यात 16 लोकांचा मृत्यू देखील झाला.
मनीला येथील टोलेजंग इमारतीच्या 53 व्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलमधील पाणी भूकंपाच्या धक्कामुळे अचानक खाली वाहू लागले. त्यामुळे भुकंपाचा हा धक्का किती तीव्र होता याचा अंदाज या व्हिडिओतून येतोय.