Ads
लाईफस्टाईल

शाओमीकडून इलेक्ट्रीक स्कूटर लाँच

डेस्क बातमीदार

स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घातलेल्या शाओमीने आता वाहनक्षेत्रात क्षेत्रात पाऊल ठेवलेय. कंपनीने नवी इलेक्ट्रीक स्कूटर HIMO T1 लाँच केलीय. ही स्कूटर केवळ चीनमध्येच लाँच केली असून कालांतराने कंपनी या दुचाकीचा विस्तार भारतीय बाजारपेठेतही करण्याची शक्यता वर्तवली जातेय. 4 जूनपासून या मोपेडची विक्री सुरू होणार आहे. जवळपास 2 हजार 999 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 31 हजार रुपये इतकी या मोपेडची किंमत असण्याची शक्यता आहे.

या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 14,000mAh क्षमतेची 13 लीथियम आयन बॅटरी आणि 350 व्हॅटची मोटार वापरण्यात आलीय. एकदा चार्ज केल्यानंतर 120 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता यात आहे.

फीचर्स

◾हाय-सेंसिटिव्ह डिजिटल डिस्प्ले
◾कलर-रेड, ग्रे, व्हाइट
◾वन टच स्टार्ट बटन
◾मल्टी फंक्शनल कॉम्बिनेशन स्विच
◾90mm रुंदी टायर
◾पुढच्या टायरला हायड्रॉलिक डिस्क ब्रेक
◾मागच्या टायरला ड्रम ब्रेक सिस्टम

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: