मुंबई – बॉलीवूडचा भाईजान सलमान खान विरोधात एका पत्रकाराने अंधेरीच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. अंधेरीच्या डी एन नगर परिसरात सलमान खान सायकल चालवत होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याचा पाठलाग करत व्हिडिओ बनवला. त्याचा सलमानला राग आल्यामुळे सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला तसेच शिवीगाळ केली असा आरोप अशोक पांडे या पत्रकाराने केलाय.
दरम्यान सलमानसोबत झालेल्या वादामुळे अशोक पांडे यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून सलमान व त्याच्या अंगरक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.