Ads
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य: कसा असेल तुमचा आजचा गुरुवार, जाणून घ्या…

डेस्क बातमीदार

मेष :- तुम्ही आनंदी व्हाल अशी घटना घडेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृषभ :- घरातील वृद्ध व्यक्तीविषयी अनेक विचार मनात येतील. नातलगांचा आधार मिळेल. राग आवरा.

मिथुन :- महत्त्वाचे काम आजच करून घ्या. स्पर्धेत चमकाल. नव्या विचाराने प्रेरित व्हाल.

कर्क :- विरोधकांच्या कारवाया लक्षात येतील. धंद्यात दुर्लक्ष होऊ देऊ नका. संयमाने कार्यभाग साधा.

सिंह :- मनावरील ताण हलका होईल. नातगांच्या मदतीला जावे लागेल. महत्त्वाचे काम करून घेता येईल.

कन्या :- तुमच्यावर वरून येणारा दबाव असला तरी नवा मार्ग शोधता येईल. दादागिरीने बोलू नका. नम्रता ठेवा.

तूळ :- प्रसिद्धीच्या झोतात याल. पदाधिकार मिळण्याची आशा वाढेल. धंद्यात लाभ होईल.

वृश्चिक :- शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. प्रकृतीत पाहिजे ती सुधारणा घडून येईल. आळस करू नका.

धनु :- विचारांची दिशाच बदलेल. नवीन लोकांचा परिचय होईल. महत्त्वाची वस्तू वेळीच जागेवर ठेवा.

मकर :- अहंकाराने बोलू नका. धंद्यात वाढ होईल. कोर्टाच्या कामात पेपर नीट बघून घ्या.

कुंभ :- महत्त्वाचा निर्णय घेता येईल. स्पर्धेत यश येईल. प्रेमाला चालना मिळेल. कला क्षेत्रात मन रमेल.

मीन :- तुमची गरूड झेप सर्वांनाच आश्चर्य देणारी असेल. आनंदी व्हाल. मान-सन्मानाचा योग येईल.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: