Ads
ब्लॉग्स

इतिहास साक्षी ‘नगारखाना’ !

डेस्क बातमीदार

रायगड किल्ल्यावरील नगारखाना. एक अशी वास्तू जिने कित्येक महाराजाच्या पद्स्पर्षाला वंदन केले. याच नगारखान्यातील नगाऱ्याने प्रत्येक महाराजांच्या विजयावर नगारा वाजवून रयतेला महाराजांच्या विजयाची माहिती दिली. इतिहासातील त्या प्रत्येक घटनेचा तो साक्ष आहे.

रायगडावरील सर्वात उंचीचे बांधकाम म्हणजे नगारखाना. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेलो की आपण किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. या नगारखाण्याच्या प्रवेशद्वारावरील सुबक, देखणी अशी शक्तीचे प्रदर्शन करणारे शिल्प आपले मन ओढून घेते. जेव्हा शिवाजी राजे स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले, तेव्हा याच  नगारे वाजवून त्यांचे स्वागत केले  गेले. तसेच येथूनच भंडारा उधळला गेला असेल, जेव्हा महाराज ३२ मन सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाले होते.

रयतेचे न्याय निवाडे सुद्धा याच नगारखान्यातच झाले.  तसेच प्रत्येक विजयी लढाईनंतर  याच नगारखान्यातून नगारे वाजवले गेले.  आऊसाहेब, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी आणि मावळे यांनी ह्याच नगारखान्यातून प्रवेश केला असेलच. अशा सर्वांचे पदस्पर्श ह्या नगारखान्याला लाभलेत. त्यामुळे प्रत्यके महाराजांचा सहवास या नगारखान्याला लाभलेला आहे. त्यामुळेच आपण येथून प्रवेश करताना आपले मस्तक उंबऱ्यावर ठेऊन आत सदरेत प्रवेश करावा.या नगारखान्यात आल्यावर एक वेगळीच उर्जा संचारते. महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा नगारखाना आजतागायत खंबीरपणे उभा आहे.

सह्याद्री आणि किल्ले प्रत्येक वेळी नवीन काही शिकवत असतात आपल्याला फक्त ते ओळखून घ्यायचे असते आणि त्याचे अनुकरण करायचे. सुर्याचे अस्ताला जाणे आणि त्याच्या त्या सौम्य सुवर्ण किरणांनी नगारखान्यावर घातलेला अभिषेक, हे दृष्य अविस्मरणीयच…

 

शब्दांकन – मयुर खोपेकर

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: