मुंबई – मतदान जनजागृतीसाठी निवडणूक आयोग सज्ज असतानाच, आता काही डॉक्टरांनी सुद्धा मतदान जनजागृती मोहिम हाती घेतली.रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शन नोटपँडवर “सदृढ राष्ट्रासाठी, मतदान करा” (#VoteforHealthynation) असा संदेश लिहून त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलेय.
चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी रूग्णालयातर्फे अशी मतदान जनजागृती मोहिम राबवली जातेय. या मोहिमेत डाँक्टर्स, नर्सेस, रूग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी होऊन नागरीकांना मतदानाचे आवाहन करतायत.
या मोहिमेत प्रिस्क्रीप्शनच्या नोटपँडवर “सदृढ राष्ट्रासाठी, मतदान करा”(#VoteforHealthynation) हा संदेश लिहत प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर सोशल मिडीयाच्या माध्यमातून डॉक्टरांचे मतदानाविषयी आवाहन करणारे व्हिडीओ नागरीकांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहेत. तसेच, रूग्णालयाच्या रूग्ण बाह्य विभागात एका बूथ च्या माध्यमातून रूग्णालयातील कर्मचारी स्वंयसेवक बनून मतदानाच महत्व नागरिकांना पटवून देण्याच कार्य सुरु आहे.