Ads
बातम्या

दोन खिलाडी एकत्र; अक्षयने घेतली मोदींची मुलाखत

डेस्क बातमीदार

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत आपण दररोज फक्त साडेतीन तास झोपत असल्याचे सांगितले. तसेच मला कामाची नशा असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज अक्षय कुमारने मोदींना अनेक प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना मोदींनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकला.

अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींची मुलाखत घेताना सुरुवातीलाच आपण राजकीय प्रश्न न विचारता व्यक्तिगत प्रश्न विचारणार असल्याचे सांगितले. अक्षयने आपल्या मुलाखतीची सुरुवातच एका लहान मुलीच्या प्रश्नाने केली आणि मोदींना तुम्ही आंबा कसा खाता असा प्रश्न विचारला.

मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :

  • चहा विकताना खूप काही शिकायला मिळालं, चांगली हिंदी तेव्हाच शिकलो : नरेंद्र मोदी
  • UN मध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय भाषण केलं, त्यामुळे आत्मविश्वास वाढला : नरेंद्र मोदी
  • वाचून भाषण करायला अवघड वाटतं : नरेंद्र मोदी
  • मी आईला पैसे देत नाही, तर आई मला देते, आजही भेटायला गेलो की आई सव्वा रुपये हातात देते : नरेंद्र मोदी
  • माझ्या कुटुंबावर सरकारचा एकही रुपया खर्च होत नाही : नरेंद्र मोदी
  • मुख्यमंत्री झाल्यानंतरही मी स्वत:चे कपडे स्वत: धुवायचो – नरेंद्र मोदी
  • खूप वर्षांपाठी मी पायी कैलास यात्रा केलीय – नरेंद्र मोदी
  • मी कठीण जीवन जगून इथे पोहोचलोय – नरेंद्र मोदी
  • विरोधकांशी खूप चांगले संबंध, ममता बॅनर्जी स्वतः माझ्यासाठी काही कुर्ते पाठवतात : पंतप्रधान मोदी
  • मला सोशल मीडियाची नाही, तर टीआरपी मीडीयाची भीती- पंतप्रधान मोदी
  • काही दिवस आई सोबत होती, मात्र उशीरा घरी येण्यामुळे आईला खूप दुःख व्हायचं : पंतप्रधान मोदी
  • आईनेच सांगितलं माझ्यासाठी वेळ वाया घालवू नको : पंतप्रधान मोदी
  • खूप लहानपणी घर सोडले, त्यामुळे आई आणि कुटुंबापासून दूर राहण्याची सवय लागली : पंतप्रधान मोदी
  • मी शिस्तप्रिय आहे, कुणाचा अपमान करत नाही : पंतप्रधान मोदी
  • चपरासी ते सचिवापर्यंत मी कुणाचाही राग करत नाही : पंतप्रधान मोदी
  • माझ्या कुटुंबाला मी नोकरी करावं असं वाटत होतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • देशासाठी काम करायला लहानपणापासून आवडायचं : पंतप्रधान मोदी
  • मी पंतप्रधान होईल असा कधी विचार केला नव्हता : नरेंद्र मोदी
  • मुलाखतीत राजकारणापलीकडचे प्रश्न विचारणार : अक्षय कुमार

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. स्वत: अक्षय कुमारे याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली होती.

“मी काहीतरी वेगळी गोष्ट करणार आहे, ती यापूर्वी कधी केलेली नाही”, असं ट्वीट करत अक्षय कुमारने सर्वांचीच उत्सुकता वाढवली होती. नक्की अक्षय कुमार काय करणार? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. अगदी राजकीय एन्ट्रीची घोषणा करणार का, इथवर अनेकांनी तर्क लढवले होते.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: