कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना 1 मे पासून रेल्वे सीट आरक्षित करता येणार.यंदा गणरायाचे आगमन 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या नियमानुसार मेल-एक्स्प्रेससाठी चार महिन्या अगोदरच तिकीट आरक्षण सुरू करण्यात येणार. मुंबईसह उपनगरातून असंख्य चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या उपाययोजना केल्या जातात.
आरक्षणासाठीचा दिवस
◼ 1 मे, बुधवार – 29 ऑगस्ट, गुरुवार
◼ 2 मे, गुरुवार – 30 ऑगस्ट, शुक्रवार
◼ 3 मे, शुक्रवार – 31 ऑगस्ट, शनिवार
◼ 4 मे, शनिवार – 01 सप्टेंबर, रविवार (हरतालिका)
◼ 5 मे, रविवार – 02 सप्टेंबर, सोमवार (श्री गणपतीचे आगमन)
◼ 6 मे, सोमवार – 03 सप्टेंबर, मंगळवार (दीड दिवस गणपतीचे विसर्जन)
◼ 7 मे, मंगळवार – 04 सप्टेंबर, बुधवार
◼ 8 मे, बुधवार – 05 सप्टेंबर, गुरुवार (गौरी आगमन)
◼ 9 मे, गुरुवार – 06 सप्टेंबर, शुक्रवार