आज 22 एप्रिल संकष्टी चतुर्थी. यानिमित्त गणपती हा विघ्नहर्ता असल्याने संकटांचे हरण करणार्या गणेशाची संकष्टी चतुर्थी दिवशी पूजा केली जाते. दर महिन्याला पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीची फूल वाहिली जातात. तसेच नैवेद्यामध्ये उकडीचे मोदक केले जातात. काही जण यानिमित्त महिन्यातून एकदा येणार्याल या संकष्टीच्या दिवशी उपवासही करतात.
चंद्रोदयाची वेळ
संकष्टी चतुर्थीचे अनेक उपासकरी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडतात. यावेळी दाते पंचांगानुसार, 22 एप्रिल या दिवशी चंद्रोदय रात्री 21:53 होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही उपवास धरला असाल तर तो संकष्टीचा उपवास तुम्हांला रात्री 9 वाजून 53 मिनिटांनी सोडता येणार.