जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९०.७६ टक्के
पुन्हा मुली अव्वल, ९२.५९ टक्के मुलींचा निकाल

पालघर जिल्ह्याचा १२ वी चा निकाल
बातमीदार | प्रतिनिधी
विरार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा गुरवारी निकाल हाती आला आहे. यात पालघर जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात मुलींचा ९२.५९ टक्के निकाल लागला असून मुलांची टक्केवारी ८९.२६ टक्के इतकी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मुलांच्या टक्केवारीत १.६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर मुलींची टक्केवारी ०. ३३ टक्क्याने कमी झाली आहे. तर जिल्ह्याचा एकुण निकाल ९०.७६ टक्के लागला आहे. त्यात सर्वाधिक निकाल ९४.७३ टक्के मोखाडा तालुक्याचा लागला आहे. वसई तालूक्याचा निकाल ९३.२० टक्के लागला आहे.
१२ वीच्या परीक्षेत पालघर जिल्ह्यातून ४९ हजार ४४८ विद्यार्थी बसले होते. यात २७ हजार १९८ मुलांचा तर २२ हजार २५० मुलींचा समावेश आहे. यात ४४ हजार ८७९ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. यातील २४ हजार २७७ मुले तसेच २० हजार ६०२ मुली या परीक्षेत उतीर्ण झाल्या आहेत.
तालुकानिहाय १२वीचा निकाल
तालुका |
एकूण टक्केवारी |
वसई |
93.20 |
पालघर |
90.16 |
डहाणू |
85.13 |
तलासरी |
89.38 |
जव्हार |
69.81 |
विक्रमगड |
87.07 |
मोखाडा |
94.73 |
वाडा |
81.11 |
एकूण पालघर जिल्हा |
90.76 |