पती-पत्नी सह ३ महिन्याच्या बालकाचा मृत्यू
Batamidar | News
विरार : विरार मध्ये गुरुवारी मध्यरात्री रेल्वे रूळ ओलांडताना एका संपुर्ण कुटुंबाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. यात पतीपत्नीसह एका ३ महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. या बाबात रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हा परिवार सुरत मधून विरारला आला होता. रेल्वे रुळ ओलांडताना विरार रुळ क्रमांक ४ येथे शुक्रवारी १२. वाजून ४ मिनीटाने हा अपघात झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
वसई येथे एका नटबोल्ड बनविणाऱ्या कंपनीत काम करणारा अजीतकुमार मंगरू पटेल (२८) हा बुधवारी बाळांतीन झालेली आपली पत्नी सिमादेवी पटेल (२६) आणि तीन महिन्याचा मुलगा आर्यन याला वसईच्या घरी आणण्यासाठी सुरतला गेला होता. तर दुसऱ्या दिवसी गुरवारी तो सुरत विरार मेलने वसईला येत असताना ही मेल विरार रेल्वे स्थालकात फलाट क्रमांक ५ वर आल्याने तो विरूध्द दिशेने उतरला. त्याला वसईला जायचे असल्याने विरार स्थानकातून त्याला लोकल ट्रेन पकडायची होती. यावेळी त्याने रेल्वे रुळ क्र. ४ वरून रस्ता ओलांडण्याचा निर्यण घेतला आणि या निर्णयानेच त्याच्या कुटुंबाचा अंत केला. गुजरातच्या दिशेने जाणारी पुणे वेरावेल एक्सप्रेस याचवेळी या मार्गावरून धावत असताना अजीत कुमार, सिमादेवी, आणि ३ महिन्याचा आर्यन या एक्सप्रेसच्या खाली आले. आणि जागीच तिघांचा मृत्यू झाला.
या बाबत माहिती देताना वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी माहिती देताना सांगितले की, अपघात हा रेल्वे स्थानकाच्या पुढे झाल्याने अंधार असल्याने त्याचे कॅमेऱ्यात चित्रिकरण झाले नाही. नातेवाईकांच्या मदतीने मयतांची ओळख पटली असून शासकीय प्रक्रिया पुर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील.