१६ वर्षानंतर हत्येचा आरोपी सापडला पोलिसांच्या जाळ्यात, उत्तराखंडामध्ये करत होते हॉटेलचा व्यवसाय
Batamidar | crime
नालासोपारा :- नालासोपारा गुन्हे शाखेच्या पथकाने १६ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. १६ वर्ष्यापूर्वी आर्थिक व्यवहाराच्या किरकोळ वादातून त्यांनी हत्या करून मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गांवर फेकून दिला होता. आणि त्याचे पुरावे नष्ट केले होते.
डिसेंबर २००७ रोजी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गांवर कर्नाळ पाडा येथे रस्त्याच्या कडेला झाडा झूडपात एक अज्ञात इसमचा मृतदेह सापडला होता. पोलीस तपासात मयत इसमाची ओळख पटली असून सापडलेला मृतदेह हा मीरारोड येथील रहिवाशी संजय विनोद झा (३२) याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. तो एका गारमेंट फॅक्ट्रीत मॅनेजर म्हणून काम करत होता. त्यावेळी या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांनी आपोरीची नावे निष्पन्न केली होती. मात्र आरोपी फरार असून सतत आपला राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलीसांना त्यांचा कधीच शोध घेता आला नाही. आणि हे प्रकरण १६ वर्षापासून पोलीस फाईलमध्ये तसेच पडून होते.
मात्र मीरा भाईंदर वसई विरा पोलीस आयुक्तलयाचे नव्याने आलेले आयुक्त मधुकर पांण्डे यांनी जुने गुन्हे निकाली काढण्याचे काम हाती घेतल्याने नव्याने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा ३ कडे देण्यात आला. त्यात पोलिस निरीक्षक बडाख यांना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत पुरणसिंग प्रतापसिंग परिहार (४१) महोनसिंग प्रतापसिंग परिहार (३८) यांना गुप्त माहीतीदाराच्या मदतीने उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्याकडूक हत्येची कबुली दिल्याने पोलीसांनी त्यांना अटक केली.
पोलिसांनी माहीती दिली की, २००७ मध्ये मुंबईत मयत विनोद झा आणि वरील आरोपी हे लोन फायनान्सचे काम करत होते. त्यातील आर्थिक व्यवहारामुळे त्यांनी विनोदची दगडाने ठेचून हत्या केली. त्याची ओळख पटू नये म्हणुन त्यांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केला होता. यामुळे पोलीसांना मयताची ओळख पटविण्यास उशीर झाला होता. दरम्यानच्या काळात दोन्ही आरोपींनी उत्तराखंडमध्ये पलायन करून तिथे एकाने हॉटेल टाकले होते. तर दुसरा किराण्याचे दुकान चालवत सामान्य जीवन जगत होते.
विनोद झा चे भाऊ अजय झा यांनी सांगितले की, विनोदच्या हत्येनंतर त्यांनी शासनाच्या दरबारी सर्व स्तरावर पत्रव्यवहार केले पण तपासात कोणतीही गती आली नव्हती. त्यांनी माहिती दिली की, विनोदला दोन मुले असून ते सध्या शिक्षण घेत आहेत. आपल्या वडिलांच्या हत्येचे आरोपी पकडल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
सदरची कामगिरी अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल मांडवे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३. विरार चे पो.नि. प्रमोद बडाख, पो.उप निरी. शिवाजी खाडे, उमेश भागवत, पो. हवा. अशोक पाटील, मुकेश तटकरे, शंकर शिंदे, सचिन घेरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो.अम. राकेश पवार, सुमित जाधव. म. सु.ब. प्रविण वानखेडे, सागर सोनवणे यांनी केली.