Batamidar | News
विरार : विरार पुर्वेच्या नालेश्वर नगर आणि कनेर येथील सरकारी जमीनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई मनपा तथा तहसील विभागाकडून मागील दोन दिवसापासून सुरू आहे. या कारवारईत २०० हून अधीक घरे तोडण्यात आली आहेत. या करवाईला येथील रहिवाशांनी विरोध करत आत्महत्या करणाचा प्रयत्न करत, शासकीय अधिकारी आणि यंत्रणेवर दगडफेक केली यामुळे कारवाई थांबविण्यात आली आहे. पण दोन दिवसाच्या कारवाईत २०० हून अधीक कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले आहेत.
विरार फाटा येथे कनेर आणि नालेश्वर परिसारात सर्वे क्र. ७ / १६, ७/१५ आणि ३ सदरची जागा ही महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. परंतू मागील काही वर्षात भुमाफियांनी या जागेवर मोठ्या प्रमाणात चाळी बांधून गोरगरीब नागरिकांना विकल्या यामुळे या ठिकाणी ४०० हुन अधीक अनधीकृत चाळी उभ्या राहिल्या आहेत. पण मागील महिन्यात मानव अधिकार भारत सरकार येथे दाखल याचिकेच्या नुसार तहसिल विभागााल कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्या नुसार तहसिल विभागाने कोणतीही पुर्व सुचना न देता मागील दोन दिवसापासून या परिसरात कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यामुळे येथे राहणाऱ्या नागिरकांना आपला संसार हलविण्यास संधी मिळाली नाही. आणि कारवाईत अनेकांचे संसार सिमेंट्या रोडारोडामध्ये गाळले गेले. या ठिकाणी आता राडारोडाचा खच पडला आहे. यात अनेकांच्या घराचे सर्व सामान आहे. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू सुध्दा नाहीत आहेत. अनेक लहान मुले, महिला वृध्द रस्त्यावर आले आहेत. कारवाई करताना शासनाने कोणतीही पुर्व सुचना दिली नसल्याने येथील रहिवासी संतापले असून कारवाई करत असताना पथकांवर दगडफेक करण्यात आली. तर एका महिलेने आपले घर वाचविण्यासाठी गळफास लावण्याचा प्रयत्न केला होता. पण तीला वाचविण्यात आले. यानंतर कारवाई रोखण्यात आली.
विरार पुर्वेला सुरू असलेल्या तोडक कारवाईमुळे येथील रहिवाशांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर शासनाची जागा होती हे शासनाला माहीत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असताना शासन झोपले होते काय असा सवाल त्यांनी विचारला आहे. ज्या भुमाफियांना या चाळी बांधल्या त्यावर गुन्हे दाखल केले का नाहीत? गरीबांची घरे तोडली त्यांनी आता जायचे कुठे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हे लोक शोधत आहेत.