
Batamidar |crime
मीरारोड :- मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका टेम्पोच्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात देशभरातील एका मोठ्या अवजड वाहनाच्या चोरीची उकल केली आहे. यात पोलिसांनी मीरारोड ते राजस्थान दरम्यान 3000 हजार हुन अधिक सिसिटीव्ही कॅमेरे तपासत,48 ट्रक, 3 टेम्पो 2 क्रेटाकार असा 4 कोटी 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपी ताब्यात घेतले आहेत. राजस्थान, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्रात या राज्यातून 22 गुन्हे पोलिसांनी उघकीस आणले आहेत. तब्बल दोन महिने या गुन्हाचा तपास चालला होता.
मीरारोड येथे राहणारे विनय कुमार पाल यांचा डिसेंबर महिन्यात एक टेम्पो रस्त्यावरून चोरी गेला होता. या संदर्भात त्यांनी काशिमीरा पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्यावरून पोलिसांनी अंदाज ही बांधला नसेल की त्यांच्या हाती असे काही लागेल. पण पाल यांच्या टेम्पोच्या तपासात पोलिसांच्या हाती एक आरोपी लागला त्याच्या कडून पोलिसांना या मागे मोठी टोळी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी 14 पोलीसांचे पथक तयार केले. आणि राजस्थान, गुजरात, हरियाणा राज्यात तपासाला रवाना केले.
तपासात चोरी गेलेल्या एका ट्रक वरील टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या फास्टटॅग ची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्याचे तांत्रिक विश्लेषण करत राजस्थान मधील मेवात गावातून फारुख खान आणि मुबीन हारीस याला अटक केली. त्यांनी देश भरातून 53 ट्रक चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, हे आरोपी गाडीचे बनावट कागदपत्रे तयार करून, गाड्या स्क्रॅब करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांची वाहतूक करून वेगवेगळ्या राज्यात विकत असत.
असल्याचे मीराभाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. यात इतर आरोपी असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत असेही त्यांनी सांगितले.
