१२ वी च्या बोर्डाने घेतली बातमीदारची दखल !!!
विद्यार्थ्यांना मिळणार लवकरच न्याय
प्रसेनजीत इंगळे | बातमीदार
विरार : २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या १२ वी च्या परिक्षेत राज्य शिक्षण मंडळाकडून इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत त्रुटी असल्याची बाब “ बातमीदारने (www.batamidar.com) निदर्शनात आणून दिल्याने एकच खळबळ उडाली. आणि १२ वीच्या बोर्डाने आपली चूक कबुल करत लवकरत त्यावर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळऊन देणार असल्याचे राज्यमंडळ सचिव पुणे, यांनी माध्यमांसाठी परिपत्रक काढून त्याला प्रसिद्धी देण्याचे आवाहन केले.
बातमीदार ने १२ वीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये प्रश्न क्र. QA3, QA4, आणि QA5 हे तीन प्रश्न २-२ गुणांसाठी होते. पण या तीनही प्रश्नांची केवळ उत्तरे छापली गेली आहेत. तर प्रश्न छापण्यात आले नसल्याचे सांगितले होते. यामुळे या प्रश्नांचे करायचे काय या बाबत विद्यार्थी संभ्रमात पडले होते. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलासा देत या प्रश्नांचे गुण दिले जातील असे सांगितले होते. पण जोवर राज्य शिक्षण मंडळाकडून अधिकृत माहिती येत नाही तोवर शिक्षक सुद्धा चिंचेत होते.
पण बातमीदार च्या बातमीची दखल घेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या राज्य सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रक काढत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत मुख्य नियमकांची संयुक्त सभा पुन:श्च आयोजित करून, या संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

राज्य सचिव यांचे परिपत्रक