Ads
गुन्हे बातमीदार स्पेशल

भूताची कायदेशीर स्टॅमपेपरवर केली जाते खरेदी विक्री

डेस्क बातमीदार

भूताची कायदेशीर स्टॅमपेपरवर केली जाते खरेदी विक्री

 

बातमीदार| प्रतिनिधी

बनारस : बनारस येथील एका गावात चक्क भुताची खरेदी केली जाते. या गावात मांत्रीक सरकारी स्टॅम पेपरवर भूत खरेदी केली जातात. या ठिकाणी भारतातील लाखो लोक भूत उतरवण्यासाठी येतात. आणि भूताची खरेदी विक्री केली जात आहे. बनारस मधील पिशाच मोचन धाम या ठिकाणी हा कायदेशीर व्यवहार अनेक वर्षापासून सुरू आहे. येथे किमान ५०१ रुपयापासून लाखो रुपयापर्यंत भूतांची खरेदी केली जाते.

बनारस मधील या पिशाच मोचन धाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भूत उतरविले जात असल्याची प्रथा आहे. या ठिकाणी असेलेल्या या धाम मध्ये भूत, पिशाच,आत्मा, चेटूक, भानामती अशा सगळ्याच प्रकारच्या भूतांवर इलाज केल्याचा दावा केला जात आहे. या आश्रमाची एक आगळी वेगळी पद्धत आहे. त्यात आधी तुम्हाला आगाऊ नोंदणी करावी लागते. त्यात तुमचे नाव, गाव, नातेवाईकांची सपुर्ण माहिती द्यावी लागते. त्या नंतर आपली समस्या सांगितली जाते. या नंतर खरा भूत खरेदी करण्याचा कार्यक्रम सुरू होतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भूतासाठी वेगवेगळे प्रकारचे मांत्रीक आहेत. ज्या प्रकारचे भूत त्या प्रकारात निपुण मात्रिकांकडून त्याचा इलाज केला जातो.

इलाज करण्यासाठी एक रुपयाचा खराखुरा स्टॅम पेपर वापरला जातो. ज्या व्यक्तीला भूतबाधा झाली आहे. त्याच्या नावाने हा पेपर खरेदी केला जातो. त्यावर जो बाधीत व्यक्ती याचा मात्रीकाकडून इलाज केला जातो. मात्रीक या व्यक्तीला काही प्रश्न विचारतो, त्यानंतर बाधीत व्यक्तीवर कुणाची बाधा झाली हे सागंतो आणि अचानक बाधीत व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेऊन मंत्रांचे उच्चारण करतो. यामुळे बाधित व्यक्ती अचानक आक्रमक होते. त्याला मांत्रिकाचे साथीदार पकडून ठेवतात. आणि मात्रीक भूताला आदेश करतो की, या व्यक्तीच्या शरीरातून निघून जा.आणि या नंतर भूत खरेदी करण्याचा धंदा सुरू होतो. स्टॅम पेपर वर किंमत टाकून या भूताची खरेदी केली जाते. आणि हा व्यवहार झाल्यानंतर बाधीत व्यक्ती सामान्य व्यक्तीसारखा वागू लागतो. यावेळी हा मात्रीक या भूताला कैद करुन या आश्रमात ठेवले जातो. आणि स्टॅम पेपरवर लिहून दिले जाते की, जर कधी भविष्यात याच भूताने पुन्हा ग्रासले तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट पैसे दिले जातील. अशा पद्धतीने कायदेशीर कारभार केला जातो. या धाम मध्ये ही प्रथा शेकडो वर्षापासून सुरु असल्याचे येथील स्थानिक सांगत आहेत. या बाबत स्थानिक प्रशासन, पोलीस यांना पुर्ण माहिती आहे.

पितृपक्षात या ठिकाणी मोठी भूतांची जत्रा भरवली जाते. या काळात या ठिकाणी लोखो लोक भूत, पितरांच्या शांतीसाठी, मोक्ष मिळविण्यासाठी येत असतात.

या बाबत अनेक वाद विवाद झाले आहेत. या धाममध्ये चालणारा हा प्रकार अंधश्रद्धेला सुपीक असल्याने अनेकवेळा या धामवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. पण लोकांच्या श्रध्देचा विषय असल्याने प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याचे सांगितले जाते.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: