शासकीय आहारातून ९ कारागृहातील आरोपींना विषबाधा
बातमीदार | प्रतिनिधी
नालासोपारा : नालासोपारा पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत असलेल्या ९ आरोपींना शासकीय आहारातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या आरोपींना महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी दिलेल्या शासकीय आहारानंतर या कैद्यांना उलट्या झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कारागृहात ९ कैदी आहेत. त्यांना मंगळवार दुपारी शासकीय एजेंसीच्या मार्फत आहार देण्यात आला होता. या नंतर काही कैदींना अचानक उलट्या सुरू झाल्याने कारागृहावर तैणात पोलीस कर्मचाऱ्यांनी वरीष्ठांना या बाबत माहिती दिली असता, त्यांना तातडीने समेळ पाडा येथील रूग्णालयात उपचाराठी दाखल करण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय अधीकारी यांनी माहिती दिली की, दाखल झालेल्या रुग्णांना अन्नातून विषबाधा झाली असून ९ रुग्ण सुरक्षित आहेत. त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
तर नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी सांगितले की, कैंद्यांना नियमित आहार दिला गेला होता. पण झाल्या प्रकाराची पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे. तपासात निषपन्न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.